राजकोट (गुजरात) येथे कथित ईशनिंदेच्या पोस्टवरून धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

  • ५ हिंदू घायाळ

  • १२ धर्मांधांना अटक

  • धर्मांध ईशनिंदेच्या प्रकरणात थेट कायदा हातात घेतात, तर बहुतांश जन्महिंदू वैध मार्गानेही साधा निषेध नोंदवत नाहीत ! – संपादक
  • गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध हे हिंदूंवर आक्रमण करू धजावतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

राजकोट (गुजरात) – येथे सामाजिक माध्यमांतून ईशनिंदा करण्यात आल्याचा आरोप करत धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांसह १२ धर्मांधांना अटक केली आहे.

१. सामाजिक माध्यमांतून करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टविषयी धर्मांधांनी हिंदूंना चर्चेसाठी बोलावले होते. ही चर्चा चालू असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले. (धर्मांधांकडून अशा प्रकारचा विश्‍वासघात होऊ शकतो, हे हिंदू कधी लक्षात घेणार ? – संपादक) यात ५ हिंदू घायाळ झाले. तसेच धर्मांधांनी वाहनांचीही तोडफोड केली.

२. विनय डोडिया नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर दीड मासापूर्वी एक कथा पोस्ट केली होती. ती इरशाद संधी नावाच्या तरुणाने आता पाहिली आणि त्याने ती हटवण्यास विनय याला सांगितले. इरशाद याने विनय याला शिवीगाळही केली होती. त्यानंतर त्याने विनय याला चर्चेसाठी बोलावले होते. तेव्हा ही मारहाणीची घटना घडली.