नवजात बालक आणि पत्नी यांना भेटायचे असेल, तर ख्रिस्ती धर्म स्वीकारा !

सासरे आणि नातेवाईक यांच्याकडून दबाव आणल्याची हिंदु पतीची तक्रार

  • धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव यांचे पालन केवळ हिंदूंनी करायचे आणि अन्य धर्मीय मात्र त्यांच्या धर्माचा प्रसार करणार, हिंदूंना धर्मांतरास बाध्य करणार, हे कधी थांबणार ? – संपादक
  • कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना ख्रिस्त्यांना अशा प्रकारचे कृत्य करण्यास धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

चित्रदुर्ग (कर्नाटक) – होसदुर्गा पोलीस ठाण्यामध्ये मारप्पा या हिंदु तरुणाने त्याचे सासरे आणि अन्य नातेवाईक यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी आरोप केला आहे, ‘माझी पत्नीला आणि तिला झालेले बाळ यांना तिच्या माहेरी जाऊन भेटण्यास सासरे आणि नातावाईक यांनी विरोध केला.’ ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास पत्नीला आणि बाळाला भेटण्यास अनुमती देण्यात येईल’, असे त्यांनी सांगितल्याने सासरे वसंत कुमार, नातेवाईक रामचंद्रप्पा, सुधाकर, मंजुनाथ, संकप्पा यांच्या विरोधात ही तक्रार नोंदवली आहे. (बाटगे ख्रिस्ती हिंदु नावे मात्र कायम ठेवून हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

मारप्पा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे, ‘६ जुलै २०२० या दिवशी विवाहाच्या वेळी पत्नीच्या नातेवाइकांनी मला पवित्र जल असल्याचे सांगत त्यात डुबकी घेण्यास बाध्य केले. तसेच त्यानंतर ‘मी ख्रिस्ती झालो’ असे त्यांनी घोषित केले. यानंतर त्यांनी ‘हिंदूंच्या देवतांची चित्रे फाडून त्यांची पूजा करू नये’, असे सांगितले. ‘जर त्यांची पूजा केली, तर मी नरकात जाईन’, असे त्यांनी सांगितले. मारप्पा यांनी ‘पत्नी आणि बालक यांना सुखरूप घरी परत आणण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.