(म्हणे) ‘जाटांनो, तुम्ही केवळ २४ सहस्र आहात, तर आम्ही ९० सहस्र आहोत, हे लक्षात ठेवा !’

  • उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यातील धर्मांधांची व्हिडिओद्वारे धमकी  !

  • जाट बांधवांना उघडपणे धमकी देणार्‍या दंगलखोरांनी केवळ १० मार्चपर्यंत वाटत पहावी ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांचे प्रत्युत्तर

  • धर्मांध बहुसंख्य झाल्यावर काय स्थिती होऊ शकते, हेच ते सांगत आहेत, हे लक्षात घेता भारत धर्मांध बहुसंख्य होण्यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापन करा ! – संपादक
  • जाट समाजातील धमकी देण्यासाठी शामली जिल्हा भारतात आहे कि पाकमध्ये ? – संपादक
व्हिडिओमध्ये धर्मांध धमकी देताना

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘तुम्ही जाट लोक केवळ २४ सहस्र आहात आणि आम्ही ९० सहस्र आहोत. शामली जिल्ह्यातील जाट समाज समाजवादी पक्ष आणि नाहिद हसन यांच्याविषयी जे कुकृत्य करत आहे, त्यावर आम्ही त्यांना धडा शिकवू, अशी धमकी देणार्‍या एका धर्मांधांचा व्हिडिओ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांनी ट्वीट केला आहे. त्यावर त्रिपाठी यांनी म्हटले आहे, ‘आमच्या वीर जाट बांधवांना उघडपणे धमकी देणार्‍या दंगलखोरांनी केवळ १० मार्चपर्यंत वाट पहावी, नंतर बुलडोझर चालवू’, अशी चेतावणी दिली आहे.

त्रिपाठी यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ कोणत्या दिनांकाचा आहे आणि तो कुठे चित्रीत करण्यात आला आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याविषयी त्रिपाठी यांनी सांगितले की, हा व्हिडिओ शामली जिल्ह्यातील आहे आणि पोलीस त्याची चौकशी करत आहेत.