कोलकाता (बंगाल) – गांधी यांच्या अहिंसात्मक आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही, तर आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैनिकी कारवाईमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट रिचर्ड अॅटली यांनीही ही गोष्ट मान्य केली होती, अशी माहिती नेताजी बोस यांचे पुतणे अर्धेंदु बोस यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.
Netaji, Azad Hind Fauj brought independence to India, affirms Subhas Chandra Bose’s nephew https://t.co/L5QiPztitN
— Republic (@republic) January 23, 2022
१. यापूर्वी नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी ‘झी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, भारताने माझ्या वडिलांसमवेत चुकीचे केले. माझे वडील एक धर्मनिष्ठ हिंदु होते आणि धर्माच्या नावाखाली लोकांची हत्या करणारे नव्हते. गांधी यांच्यामुळे झालेल्या फाळणीच्या वेळी लोकांच्या हत्या झाल्या.
२. अनिता बोस पुढे म्हणाल्या की, माझे वडील बंडखोर वृत्तीचे होते. त्यामुळे गांधी त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. काँग्रेसच्या एका गटाने नेताजींच्या विरोधात काम केले, त्यांच्या सहकार्यांची निंदा केली. ब्रिटिशांशी लढण्यासाठी अन्य स्वातंत्र्यसैनिकांना जसा सरकारकडून लाभ देण्यात आला, तसा लाभ नेताजी बोस यांच्या सहकार्यांना देण्यात आला नाही.