रस्त्याच्या रुंदीकरणात हनुमान मंदिर हटवले, तर त्याच्या समोरील चर्च बजरंग दल एका दिवसात हटवेल !  

बजरंग दलाचे प्रांताध्यक्ष रतन यादव यांची प्रशासनाला चेतावणी

रस्त्याच्या रुंदीकरणात हिंदूंची धर्मिक स्थळे आली की, ती प्रशासनाकडून तत्परतेने हटवली जातात आणि हिंदूंही त्यांना साहाय्य करतात; मात्र अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे आली, तर प्रशासन शेपूट घालते अन् धर्मांधही कायदा हातात घेऊन त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

बजरंग दलाचे प्रांताध्यक्ष रतन यादव

दुर्ग (छत्तीसगड) – येथील नेहरूनगर ते पुलगाव पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. या रुंदीकरणामध्ये येणारे एक हनुमान मंदिर हटवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नाला बजरंग दलाचे प्रांताध्यक्ष रतन यादव यांनी विरोध केला आहे. रतन यादव यांनी पत्रकार परिषदेत चेतावणी दिली की, छत्तीसगड राज्यामध्ये सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात येत आहेत. यात लव्ह जिहाद, थुंकी जिहाद, धर्मांतर आदींचा समावेश आहे. आता हनुमान मंदिर हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  जर प्रशासन मंदिर हटवण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मंदिरासमोर असणारे चर्च हटवण्यासाठी बजरंग दलाला एक दिवसही लागणार नाही आणि याचे दायित्व प्रशासनाचेच असेल.
रतन यादव यांनी आरोप केला की, शहरातील मोहननगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. यासह ते घरगुती प्रकरण सांगत त्याची चौकशी करण्याचे टाळले जात आहे. आम्ही पोलिसांना आग्रह करतो की, गेल्या २ नोव्हेंबरपासून जितकी धर्मांतराची प्रकरणे आली आहेत, त्यावर त्यांनी कारवाई करावी.