
कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने १६ जानेवारी या दिवशी ३४१ वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील स्मारक परिसरात रांगोळी काढून संपूर्ण स्मारक परिसरात फुलांची सजावट करण्यात आली. यानंतर उपस्थित सदस्य आणि शिवशंभूप्रेमी यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करून मानाचा मुजरा करण्यात आला. उपस्थितांना साखर-पेढे यांचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. या वेळी ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. साताप्पा कडव, उपाध्यक्ष श्री. योगेश रोकडे, सर्वश्री प्रशांत जाधव, प्रफुल्ल भालेकर, प्रवीण कुरणे, श्रेयस कुरणे, मनीष बडदारे यांसह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !