आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – गोमाता आणि गोवंश यांच्या मांसाची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करणारे प्राणीकल्याण अधिकारी आशिष बारीक आणि गोरक्षक प्रतीक नाणेकर यांच्यावर आक्रमण करणार्‍या ७ धर्मांधांना न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. कुर्ला येथील महानगर न्यायदंडाधिकार्‍यांनी १७ जानेवारी या दिवशी ही शिक्षा दिली. या प्रकरणी पोलीस चौकशी चालू आहे.

१६ जानेवारीला पहाटे आशिष बारीक आणि प्रतीक नाणेकर यांच्यावर धर्मांधांच्या टोळक्याने कुर्ला येथील कुरेशीनगर येथे आक्रमण केले. यामध्ये आशिष बारीक गंभीर घायाळ झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.