|
|

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) – येथील आर्.पो. उत्तरवार फुटीर रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांची ११ जानेवारी या दिवशी धर्मांधांनी हत्या केली. या हत्येसाठी मुख्य आरोपीला साहाय्य करणार्या सय्यद तौसिफ सय्यद खलील (वय ३५ वर्षे), सय्यद मुस्ताक सय्यद खलील (वय ३२ वर्षे), शेख मोहसिन शेख कय्युम (वय ३४ वर्षे), शेख शहारूख शेख आलम (वय २७ वर्षे) या ४ धर्मांधांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अब्रार (वय २२ वर्षे) अजूनही पसार आहे. त्याने पूर्ववैमनस्यातून डॉ. धर्मकारे यांच्यावर पाळत ठेवून उमरखेड-पुसद रस्त्यावरील साखळी महाविद्यालयासमोर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी १५ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गुन्ह्याचा तपास व्यावसायिक कौशल्याचा आणि पुराव्यांचा पुरेपुर उपयोग करीत ४८ घंट्यांत उघडकीस आणल्याविषयी पोलीस अधीक्षकांनी तपास पथकातील सर्व पोलीस अधिकार्यांना १ लक्ष रुपये प्रोत्साहनपर बक्षीस घोषित केले आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न