सीतामढी (बिहार) येथील मदरशाच्या मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

विविध मदरशांतील असे घृणास्पद प्रकार वारंवार समोर येऊनही काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी कुणीही अशा मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सीतामढी (बिहार) – येथील मदरशाचा मौलवी तबरेज याने मदरशात शिकण्यासाठी येणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलगी ५ मासांची गर्भवती राहिल्यावर ही घटना समोर आली. मौलवीने त्याच्या कृत्याचा व्हिडिओ काढला आणि तो प्रसारित करण्याची धमकी देत त्याने पीडितेवर अनेकदा बलात्कार केला.

पीडितेच्या घरातील लोकांना ती गर्भवती असल्याचे समजल्यावर त्यांनी मौलवीविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.