महाराष्ट्रातील असुरक्षित मंदिरे ! – संपादक

उमरगा (जिल्हा धाराशिव) – शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बिरुदेव मंदिरातील २ दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यांतील ६० सहस्र रुपये पळवल्याची घटना ६ जानेवारीच्या पहाटे घडली. मंदिराचे पुजारी बालाजी दिनकर घोडके ५ जानेवारी या दिवशी रात्री साडेनऊ वाजता नित्य-नियमाप्रमाणे दोन्ही मंदिरे बंद करून मंदिराच्या इमारतीत ५ ते ६ व्यक्तींसमवेत झोपले होते. पहाटे उठल्यानंतर त्यांना मंदिराच्या समोर ठेवलेल्या दोन्ही दानपेट्या दिसल्या नाहीत. या संदर्भात माजी नगरसेवक मधुकर घोडके यांनी पोलिसांना माहिती दिली. सकाळी श्वानपथक आणि ठसे तज्ञ यांच्या पथकांनी पडताळणी केली आहे. रात्री चोरट्यांनी दोन्ही लोखंडी दानपेट्या उचलून मंदिरालगत असलेल्या दुसर्या वाड्यात नेऊन फोडल्या. पुजारी घोडके यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !