धर्मांधाने हिंदु मुलीला फसवून नेपाळला नेले आणि तिचे धर्मांतर करून केले लग्न !
|
हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त करणार्या ‘लव्ह जिहाद’ चे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे ! – संपादक
लक्ष्मणपुरी (लखनौ) – ईशान बुखारी याने एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यासमवेत नेपाळला पलायन केले. त्यानंतर धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. याविषयीची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ‘धर्मजागरण’ संघटनेच्या नेत्यांनी तिची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध ‘उत्तरप्रदेश विधी विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश’ या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
१. मिळालेल्या माहितीनुसार या जुलैमध्ये पीडित युवतीने तिला चंडीगडमध्ये नोकरी मिळाल्याचे घरी सांगितले. पीडित युवती चंडीगड येथे गेल्यानंतर ऑगस्टमध्ये आरोपीने पीडितेच्या कुटुंबियांना दूरभाष करून सांगितले की, मी तुमच्या मुलीशी लग्न केले आहे. मुलगा अल्पसंख्यांक समाजाचा असल्याचे समजल्यावर त्यांनी मुलीला परत बोलावण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पीडित युवतीच्या नातेवाइकांना तो लवकरच मुलीला घेऊन लक्ष्मणपुरी येथे येत असल्याचे सांगितले; परंतु तो पीडितेला घेऊन नेपाळची राजधानी काठमांडू येथे गेला.
२. पीडितेच्या आईला संशय आल्याने तिने पोलीस ठाण्यामध्ये प्रथमदर्शनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी ‘मुलगी सज्ञान असल्याने ती लग्न करण्यास स्वतंत्र आहे’, असे तिच्या आईला सांगितले आणि तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.
३. पीडित युवतीच्या आईने सांगितले की, माझ्या मुलीचा भ्रमणभाष आला होता. तिला काठमांडूमध्ये ठेवण्यात आले असून प्रतिदिन मारहाण करण्यात येत आहे. तसेच तिच्याकडून अनैतिक कामेही करून घेण्यात येत आहेत. तिचे धर्मांतर करण्यात आले असून लग्न करण्यात आले आहे आणि आता ती ७ मासांची गर्भवती आहे. आरोपीने ६ हून अधिक मुलींचीही विदेशात विक्री केली आहे.
४. याविषयी जम्मू-काश्मीरमधील ‘धर्मजागरण’ संघटनेच्या नेत्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी सुरक्षितपणे पीडितेला नेपाळहून परत आणले आणि काश्मीरच्या नारी संरक्षणगृहामध्ये पाठवले.
विविध नावांनी हिंदु मुलींना फसवून त्यांची विदेशात विक्री करणारा ईशान बुखारी
महाराष्ट्रातील महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी ईशान बुखारीला ऑगस्ट २०१७ मध्ये अटक केली होती. त्याचे खरे नाव ताहिर अहमद बुखारी असून तो काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ईशान पुष्कळ काळापासून महिलांना फसवण्याचे काम करत आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये आरोपीला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. तसेच काश्मीर पोलिसांनीही त्याला अनेक वेळा अटक केली आहे. (धर्मांधांना कठोर शिक्षा न केल्याचा आणि कायद्याचा धाक नसल्याचा परिणाम ! – संपादक) त्या वेळी तो ५ लग्न करण्याच्या बेतात होता आणि अन्य मुली त्याच्या संपर्कामध्ये होत्या. १२ वी उत्तीर्ण असलेल्या ताहिरने कॅनडा, लंडन आणि मिस्र येथील अनेक नामांकित महाविद्यालयांच्या खोट्या पदव्यांच्या आधारे रुग्णालयांमध्ये नोकर्याही केल्या आहेत.
आग्रा (उत्तरप्रदेश) येथील अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणार्या धर्मांधाला हिंदुत्वनिष्ठांच्या दबावानंतर अटक !
लव्ह जिहाद करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच अन्य धर्मांधांना जरब बसेल ! – संपादक

आग्रा (उत्तरप्रदेश) – कसबा अमांपूर येथील एका धर्मांधाने १५ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला ‘राजू’ असे खोटे नाव सांगत प्रेमाच्या जाळ्यात फसवले आणि तिला घेऊन पलायन केले. मुलीच्या नातेवाइकांनी मुलीचा शोध घेतला, तेव्हा ‘राजू’ हा हिंदु नसून अल्पसंख्यांक असल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस तक्रार नोंदवली. १ जानेवारी २०२२ या दिवशी या प्रकरणाचे पोलिसांनी त्वरित अन्वेषण करावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. तसेच ‘हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात धर्मांतराची कलमे लावावीत’, अशी मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून अशी कलमे लावून गुन्हा का नोंदवत नाहीत ? – संपादक) त्यानंतर पोलिसांनी १ जानेवारी २०२२ या दिवशी रात्री उशिरा आरोपीला अटक केली आणि मुलीला कह्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचे अन्वेषण केल्यानंतर आरोपीच्या विरोधात अधिक कलमे वाढवण्यात येतील.
महंमद शाकिरने ‘शिवम्’ बनून हिंदु युवतीला फसवले आणि अश्लील चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी देत केला अनेक वेळा बलात्कार !
बागपत (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादची घटना !
मोगलांच्या राजवटीत दिवसाढवळ्या हिंदु महिलांना बाटवण्यात येत होते. आता छळकपट करून आणि सामाजिक माध्यमांच्या साहाय्याने त्यांना बाटवण्यात येत आहे. काळ पालटला; पण वृत्ती तीच असून ती थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – संपादक
बागपत (उत्तरप्रदेश) – बागपतमधील महंमद शाकिर याने ‘शिवम्’ बनून हिंदु युवतीचा अनेक दिवस पाठलाग करून तिला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसवले. पीडित युवतीला शाकिरचे खरे स्वरूप समजल्यावर तिने त्याच्याशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला; परंतु शाकिरने तिच्या अश्लिल चित्रफिती आणि छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. बडौत येथील २१ वर्षीय पीडितेने सांगितले की, ती ११ वीमध्ये शिकत असतांना महंमद शाकिर तिचा विद्यालयामध्ये येता-जाता पाठलाग करायचा. आधी तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु एक दिवस पीडित युवती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली गेली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले. तोपर्यंत पीडित युवतीला शाकिरचे खरे स्वरूप ठाऊक नव्हते.
२. कुटील मानसिकतेच्या शाकिरने हळूहळू पीडितेशी शारीरिक संबंध निर्माण केले आणि तिच्या अश्लील चित्रफिती बनवल्या. एक दिवस पीडितेला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ती ज्या शिवम्शी प्रेम करत होती, तो वास्तविक महंमद शाकिर असल्याचे तिला समजले. त्यानंतर तिने शाकिरशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. तिने ही गोष्ट तिच्या नातेवाइकांनाही सांगितली. त्यानंतर ते बडौत येथील शाकिरच्या घरी गेले. तेथे शाकिरच्या कुटुंबियांनी पीडितेच्या नातेवाईकांना शिव्या देऊन हाकलून दिले.
३. पीडित युवतीने शाकिरशी संबंध तोडले; पण त्याने तिच्या अश्लील चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करणे चालू ठेवले.
४. पीडित युवतीने ‘स्वराज’ मासिकाला सांगितले की, तिच्या वडिलांचे अनुमाने १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून घराचे दायित्व तिच्यावरच होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये तिचे त्यांच्याच जातीतील मुलाशी लग्न जुळले. त्यानंतर तिचा भावी पती तिला भेटायला आला. तेव्हा त्याने तिची ती सर्व छायाचित्रे पीडित युवतीला दाखवली. याचा तिला जबर धक्का बसला. तथापि तिच्या भावी पतीने तिच्याशी सोयरिक तोडली नाही. सध्या तिचा विवाह स्थागित करण्यात आला आहे.
५. यानंतर पीडित युवती नातेवाइकांसमवेत पोलीस ठाण्यात गेली आणि आरोपीच्या विरुद्ध बलात्काराचे प्रकरण नोंदवले. सध्या पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी शाकिरच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
जावेदने ‘राकेश’ बनून विवाहित हिंदु महिलेची केली फसवणूक !
|
मध्यप्रदेशमध्ये लव्ह जिहादचा कायदा असूनही त्याचे भय धर्मांधांना राहिलेले दिसत नाही. त्यामुळे धर्मांधांना शरीयतनुसार शिक्षा केली पाहिजे ! – संपादक
अशोकनगर (मध्यप्रदेश) – येथील जावेद याने ‘राकेश’ या हिंदु नावाने एका विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवले आणि पत्नीसारखे वागवून तिचे लैंगिक शोषण केले. महिलेने लग्न करण्याविषयी दबाव टाकल्यावर जावेदने त्याचा खरा परिचय उघड केला आणि लग्न करण्यासाठी मुलांसमवेत मुसलमान होण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. या प्रकरणी तक्रार केल्यावर पोलिसांनी जावेदला अटक केली आहे.
अशोकनगर जिल्ह्याच्या शंकर कॉलनीतील ३० वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या पतीशी वाद झाला होता. त्यामुळे ती घरात एकटी रहात होती. महिलेसमवेत तिची ३ मुलेही रहात होती. त्या कालावधीत वर्ष २०१६ मध्ये पीडितेचा जावेदशी परिचय झाला. तेव्हा त्याने ‘राकेश कुशवाहा’ या नावाने त्याचा परिचय करून दिला. जावेदने हळूहळू पीडितेशी जवळीक वाढवली आणि लग्न करण्याची भूलथाप देऊन तिला जाळ्यात ओढले आणि तिचे लैंगिक शोषण केले. त्यातून तिला एक मुलगाही झाला.
मुलगा झाल्यानंतर पीडितेने त्याच्यावर लग्न करण्याचा दबाव निर्माण केला; परंतु तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर जावेदने तो मुसलमान असल्याचे संगितले. त्याने पीडितेला सांगितले की, तिला त्याच्याशी लग्न करायचे असेल, तर आधी मुसलमान व्हावे लागेल आणि पहिल्या पतीच्या ३ मुलांचेही धर्मांतर करावे लागेल. याविषयी तिने तिचा भाऊ आणि वडील यांना माहिती दिली. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी पोलीस तक्रार नोंदवली.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !