|

वडखळ (जिल्हा रायगड) – पोलीस असल्याचा अपलाभ घेत पेण येथील एका विवाहितेला तिच्या पतीला आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन वर्ष २०१५ पासून बळजोरीने शारीरिक संबंध ठेवणारा पोलीस हवालदार श्याम जाधव याच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जाधव याच्याविरोधात ही महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता आरोपीने पेण पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. सेवेत असलेल्या महिला पोलीस नाईक आणि महिला पोलीस उपनिरीक्षक यांना शिवीगाळ केली, तसेच समजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही मारहाण केली. जाधव याला अटक केली असून ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (पोलीसच असे वागत असतील, तर ते कायद्याचे रक्षण कसे करणार ? अशा पोलिसांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे. – संपादक)
जाधव याला तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांना त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली. या प्रकरणीही आरोपी श्याम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
Puneeth kerehalli : हिंदुत्वनिष्ठ पुनीत केरेहळ्ळी यांना पोलिसांकडून रायचुरू जिल्हाबंदी