गो-प्रदक्षिणा

गवां दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्याच्चैव प्रदक्षिणम् ।
प्रदक्षिणीकृता तेन सप्तद्वीपा वसुन्धरा ।।

                               – गोसावित्रीस्तोत्र, श्लोक १३

अर्थ : गोमातेचे दर्शन घेतल्यावर तिला नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे सात द्वीपे (टीप) असलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळते.

टीप : ‘जम्बु, कुश, प्लक्ष, क्रौंच, शाल्मलि, शाक आणि पुष्कर या सात द्वीपांमध्ये पृथ्वी विभागली आहे’, असे वर्णन पुराणांत आढळते. (हल्लीचे पृथ्वीचे खंड – आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक)

(साभार : मासिक ‘कल्याण’, नोव्हेंबर २०२१)

हे ज्ञान ज्ञात नसलेले आणि गायींना खाटीकखान्यात पाठवणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे हिंदू राज्यकर्ते केवळ जन्महिंदू आहेत, कर्महिंदू नव्हेत. याचे फळ त्यांना भोगावे लागेल. – संपादक