संपूर्ण भारतात विद्यार्थी शिकत असतात, लाखो रुग्ण, तसेच वृद्ध रहातात, त्यांच्यासाठी असा निर्णय संपूर्ण देशातच घेतला गेला पाहिजे ! – संपादक
जलपाईगुडी (बंगाल) – येथे विद्यार्थ्यांना शिकतांना त्रास होऊ नये, यासाठी येथील एका मशिदीवरील ध्वनीक्षेपकाचा अजान ऐकवण्यासाठी वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच या मशिदीने मुलांच्या शिक्षणासाठी जागाही दिली आहे.
पश्चिम बंगाल: बच्चों की पढ़ाई में बाधा न पहुंचे जलपाईगुड़ी में एक मस्जिद अज़ान के समय लाउडस्पीकर का इस्तेमाल नहीं करता।
स्कूल के शिक्षक इंद्रनील साहा ने बताया, “स्थानीय लोगों ने काफ़ी सहयोग किया है। पढ़ाई में किसी भी तरह की बाधा ठीक नहीं इससे बच्चों का ध्यान भी भटकता है।”(10.12) pic.twitter.com/uixlpPRJ4w
— ANI_HindiNews (@AHindinews) December 11, 2021
१. मशिदीचे इमाम नजीमुल हक यांनी सांगितले की, यापुढे आम्ही ध्वनीक्षेपकाविनाच मशिदीत अजान देऊ. (जर येथे ध्वनीक्षेपकाविना अजान देता येऊ शकते, तर संपूर्ण भारतातही असे करणे शक्य आहे; मग यासाठी प्रयत्न का केला जात नाही ? – संपादक) त्यामुळे ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि मुलांना शाळेत शांततेने अभ्यास करता येणार आहे. (मशिदींवरील ध्वनीक्षेपकामुळे ध्वनीप्रदूषण होते, हे ठाऊक आहे, तरीही इतके दिवस त्याचा आणि भारतातील अन्य मशिदींवरील ध्वनीक्षेपक यांचा वापर का करण्यात येत आहे ?, असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)
२. शाळेचे शिक्षक इंद्रनील साहा यांनी सांगितले की, मशिदीमध्ये अजान आणि नमाजपठण यांसाठी ध्वनीक्षेपक न वापरण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मशिदीच्या प्रशासनाने आम्हाला चांगले सहकार्य केले. (मशिदीच्या प्रशासनाने सहकार्य केले नसते आणि ध्वनीक्षेपक चालूच ठेवले असते, तर शाळेच्या प्रशासनाने भीतीपोटी आणि दहशतीमुळे ते रोखण्यासाठी प्रयत्न केले नसते, हेही तितकेच खरे आहे ! – संपादक)