धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांद्वारे सी.डी.एस्. बिपीन रावत यांच्या मृत्यूचा मोठ्या प्रमाणात आसुरी आनंद साजरा केल्याचा परिणाम !
(सी.डी.एस्. – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख)
|
कोच्ची (केरळ) – सी.डी.एस्. जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही व्यक्तींकडून झालेल्या त्यांच्या अपमानामुळे व्यथित होऊन आम्ही इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर यांनी दिली. ते त्यांच्या पत्नीसह हिंदु धर्मामध्ये प्रवेश करणार आहेत. धर्मांधांनी रावत यांच्या निधनाचा मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करणारी विधाने आणि चित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली होती. त्यामुळेच अकबर यांना याचे वाईट वाटून त्यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याविषयीचा एक व्हिडिओही फेसबूकवर प्रसारित केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला अनेक मुसलमान वापरकर्त्यांनी विरोध दर्शवला, तसेच त्यांच्यावर टीका करतांना अपशब्दही वापरले.
चित्रपट दिग्दर्शक इस्लामचा त्याग करुन बनणार हिंदू …जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांनी दुखावल्यानंतर अली अकबर यांचा निर्णय#AliAkbar#Hindutva#FacebookLivehttps://t.co/HFewoY9CBr
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) December 11, 2021
१. अकबर यांनी सांगितले की, इस्लामच्या वरिष्ठ नेत्यांनीही या शूरवीर सैन्यदलप्रमुखांचा अपमान करणार्या राष्ट्रद्रोह्यांना विरोध केला नाही. या सर्व प्रकारामुळे माझा या धर्मावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे आज मी जन्मापासून मिळालेल्या या ओळखीचा त्याग करत आहे. आजपासून मी मुसलमान नाही. मी एक भारतीय आहे. माझे हे उत्तर त्या लोकांसाठी आहे, ज्यांनी जनरल रावत यांच्या निधनाच्या वृत्तावर सहस्रो हसणार्या ‘इमोजीज्’ (विविध प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी सामाजिक माध्यमांवर वापरण्यात येणारी लहान चित्रे) प्रसारित केल्या आहेत.
२. दुसर्या एका पोस्टमध्ये अकबर यांनी लिहिले की, जनरल रावत यांच्या निधनानंतर हसणार्या लोकांची देशाने ओळख पटवून त्यांना शिक्षा दिली पाहिजे. (जे एका चित्रपट निर्मात्याला कळते, ते पोलीस आणि सरकार यांना का कळत नाही ? – संपादक) सामाजिक माध्यमांवर अनेक देशविरोधी कृत्ये चालू असतात. रावत यांच्या मृत्यूवरून हसणे, हे त्याचे ताजे उदाहरण आहे. रावत यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणारे विशिष्ट धर्माचे आहेत. रावत यांनी पाकिस्तान आणि काश्मीर येथील आतंकवाद्यांच्या विरोधात अनेकदा कठोर कारवाया केल्या असल्याने त्यांच्या मृत्यूवर काही लोक हसले.