नवी देहली – तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्या अपघातात झालेल्या मृत्यूविषयी अनेकजण शंका उपस्थित करत असून ‘यामागे काही घातपात तर नाही ना ?’, अशी विचारणा करत आहेत. या अपघाताची चौकशी करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत घोषणा केली आहे.
IAF has constituted a tri-service Court of Inquiry to investigate the cause of the tragic helicopter accident on 08 Dec 21. The inquiry would be completed expeditiously & facts brought out. Till then, to respect the dignity of the deceased, uninformed speculation may be avoided.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 10, 2021
त्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाने ट्वीट करून म्हटले आहे की, ८ डिसेंबर २०२१ या दिवशी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय वायूदलाने चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी जलद गतीने पूर्ण कारून वस्तूस्थिती समोर आणली जाईल. तोपर्यंत मृत व्यक्तींची प्रतिष्ठा राखण्यासाठी अफवा टाळाव्यात.