
पोर्ले तर्फ ठाणे (तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर), ७ डिसेंबर (वार्ता.) – येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पोर्ले तर्फ ठाणेच्या शाखाप्रमुख सौ. चंद्रभागा चौगुले यांनी त्यांचा मुलगा श्री. सूरज याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सनातन पंचांग २०२२’, तसेच सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ग्रंथ जिज्ञासूंना भेट म्हणून दिले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर उपस्थित होत्या. (मुलाच्या वाढदिवसानिमित्त धर्मप्रसारासाठी ‘सनातन पंचांग २०२२’, तसेच सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ग्रंथ जिज्ञासूंना भेट देणार्या सौ. चंद्रभागा चौगुले यांचे अभिनंदन ! हाच आदर्श ठेवून अन्य जणही प्रत्येक कार्यक्रमात धर्मप्रसार करू शकतात ! – संपादक)
या वेळी मरगुबाई मंदिर येथे धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि दत्तजयंती या निमित्ताने प्रवचन घेण्यात आले. त्यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त’ हा सामूहिक नामजप करवून घेण्यात आला.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे