खोटे आरोप करणार्या नवाब मलिक यांना आमदार अतुल भातखळकर यांची कोपरखळी !

मुंबई – नवाब मलिक, फुसक्या फटाक्यांचा धूर खूप केलात; पण पुरावे कुठे आहेत ? काल सनातन संस्थेवर केलेल्या बिनबुडाच्या आरोपामुळे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन थापा मारता, हे उघड झालेले आहे, असे ‘ट्वीट’ भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी १० नोव्हेंबर या दिवशी केले आहे.
नवाब मलिक फुसक्या फटाक्यांचा धूर खूप केलात, पण पुरावे कुठे आहेत? काल सनातन संस्थेवर केलेल्या बिनबुडाच्या आरोपामुळे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन थापा मारता हे उघड झालेले आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 10, 2021
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘नवाब मलिक यांचा गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध आहे’, या केलेल्या आरोपाविषयी ९ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांनी स्पष्टीकरण दिले. या वेळी मलिक यांनी ‘असा कुणाचाही संबंध जोडायचा झाला, तर दाऊद कासकरचे कोकणातले घर सनातन संस्थेने घेतले आहे; मग ‘सनातनचा दाऊदशी किंवा गुन्हेगारी जगताशी संबंध आहे’, असे म्हणायचे का ?’ असे धांदात खोटे विधान केले. यावर सनातन संस्थेने प्रसिद्धीपत्रक काढून आतंकवादी दाऊद याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे नवाब मलिक यांचा खोटारडेपणा उघड झाला. नवाब मलिक यांच्या या खोटे बोलण्यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी वरील विधान केले आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !