
जमशेदपूर (झारखंड) – सनातनचे साधक श्री. सुदामा शर्मा आणि सौ. रेणु शर्मा यांनी येथील राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग-२०२२’ भेट म्हणून देण्यात आले. सनातन पंचांग पाहून श्री. ओझा यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘अनुमाने ६-७ वर्षांपूर्वी मला सनातन पंचांग मिळाले होते. ते मी अजूनही जपून ठेवले आहे.’’
श्री. ओझा यांच्या माध्यमातून मागील ४ मासांपासून दैनिक ‘जागरण’च्या स्थानिक आवृत्तीमध्ये हिंदु जनजागृती समितीची प्रसिद्धीपत्रके, सनातन संस्थेने वेळोवेळी दिलेली सण-उत्सवांविषयीची शास्त्रीय माहिती, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शोध प्रबंध आदी प्रकाशित करण्यात येत आहेत. या वेळी श्री. ओझा यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी