|

सातारा, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील दोघा अल्पवयीन धर्मांधांनी २६ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता सदरबझार येथील मारुति मंदिरात घुसून मूर्तीची विटंबना केली. दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे भाविक मंदिरात दर्शनासाठी गेले असता मूर्तीची विटंबना केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता हा प्रकार २ धर्मांधांनी केला असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सदरबझार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी दोघा अल्पवयीन धर्मांधांना कह्यात घेतले आहे. या घटनेनंतर सदरबझार परिसरात तणावाचे वातावरण होते. येथे दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून सदरबझार परिसर बंद ठेवण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी हिंदु आणि मुसलमान समाजातील प्रमुखांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले.

धर्माभिमानी हिंदूंनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. २७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन श्री मारुतीच्या मूर्तीवर महाअभिषेक केला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
धर्मांधांच्या कुरापती नित्याच्याच !
सदरबझारच्या जवळच अवैध पशूवधगृह आहे. त्यामुळे तेथील हिंदूंना नेहमीच धर्मांधांच्या विविध कुरापतींना सामोरे जावे लागते. गोहत्या, गायींची तस्करी, गोमांस इतरत्र फेकणे, असे प्रकार या परिसरामध्ये कायम घडत असतात. आतातर थेट हिंदूंच्या मंदिरांमध्ये प्रवेश करण्यापर्यंत धर्मांधांची मजल गेली. (असे प्रकार होत असतांना पोलिसांना लक्षात येत नाहीत का ? पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर धर्मांधांचे पुढील अपप्रकार करण्याचे दु:साहस झालेच नसते ! – संपादक)
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !