मुंबई – माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे असून ते हिंदु आहेत, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांच्या नाव ‘दाऊद’ असे लिहिले आहे. नोकरीसाठी समीर वानखेडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात समीर वानखेडे यांनी त्यांची आई मुसलमान असून ते धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असल्याचे म्हटले आहे. नवाब मलिक यांनी माझ्या कौटुंबिक गोपनीयतेवर अनावश्यक आक्रमण केले आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची अपकीर्ती करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे.