देशी गायींच्या संवर्धनाची आवश्यकता ! – पू. काडसिद्धेश्वर महाराज, कणेरी मठ, कोल्हापूर

पू. काडसिद्धेश्वर महाराज, कणेरी मठ, कोल्हापूर

पुणे – देशातील पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील देशी गायींच्या पारंपरिक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील देशी गायींच्या ६ ते ७ प्रजाती बर्‍यापैकी तग धरून आहेत; परंतु या देशी गाईंच्या प्रजातीचे संवर्धन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील कणेरी मठाचे पू. काडसिद्धेश्वर महाराज यांनी केले. ‘महात्मा फुले कृषी विद्यापिठा’च्या पुणे येथील कृषी महाविद्यालयाचा पशूसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग अन् देशी गोवंश संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पुण्यात ‘देशी गोपालक आणि गोशाळा चालक’ परिसंवाद आयोजित केला होता, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘महात्मा फुले कृषी विद्यापिठा’चे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, ‘कोकण कृषी विद्यापीठा’चे कुलगुरु डॉ. संजय सावंत आदी उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारच्या माध्यमातून हे देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र साकारले जात आहे. संगोपन आणि प्रशिक्षण यांना विज्ञानाची जोड देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल. त्यामध्ये गोमूत्र, शेण आणि गाय यांवर संशोधन केले जाणार आहे.