विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या ‘मॉर्डन गुरुकुल ॲकॅडमी’च्या विरोधात युवा सेनेच्या पुढाकाराने तक्रार !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोल्हापूर, २० ऑक्टोबर – येथील ‘मॉर्डन गुरुकुल अकॅडमी’ने १०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून ३ सहस्र रुपयांच्या ‘वेब डिजाईन कोर्स’चे १४ सहस्र रुपये घेतले. या विद्यार्थ्यांना ‘शासनमान्य प्रमाणपत्र देतो’ असे सांगून स्वत:जवळील बनावट प्रमाणपत्र दिले. याविषयी विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे तक्रार केल्यावर युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी संबंधित ‘ॲकॅडमी’च्या मालकांना जाब विचारला. यानंतर युवासेनेच्या पुढाकाराने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या वेळी युवासेना उपशहर प्रमुख वैभव जाधव, विभागप्रमुख मंगेश चितारे, शुभम मोरे, संदीप घाटगे यांसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.