जगभरातील शिया मुसलमानांना लक्ष्य करण्यात येणार ! – इस्लामिक स्टेटची घोषणा

जेथे मुसलमान अल्पसंख्यांक असतात, तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देतात आणि जेथे केवळ तेच असतात, तेव्हा ते एकमेकांच्या जातीचा द्वेष करत एकमेकांना ठार मारतात ! त्यामुळे ‘इस्लाम हा शांतीचा धर्म’ असे म्हटले, तरी वस्तूस्थिती त्याहून वेगळीच असल्याचे दिसून येते ! – संपादक

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी (प्रातिनिधिक छायाचित्र)

बगदाद (इराक) – इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेने जगातील शिया मुसलमानांना लक्ष्य करण्याची घोषणा केली आहे. इस्लामिक स्टेटचे साप्ताहिक ‘अल् नब्बा’मध्ये शिया मुसलमान आणि त्यांची घरे यांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण अफगाणिस्तानमधील शिया मुसलमानांच्या एका मशिदीमध्ये नमाजपठणाच्या वेळी आत्मघाती बाँबस्फोटामध्ये ४७ लोकांचा मृत्यू झाला होता. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटनेच घेतले होते.