माऊलीच्या रूपात वसे ही दुर्गामाई ।

।। श्रीसत्‌शक्तिदेव्यै नमः।।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
आधुनिक पशूवैद्य (डॉ.) अजय जोशी

तुम्हा घडविले श्रीविष्णूने ।
आणि तुम्ही
देवरूप झालात ।। १ ।।

साधक आणि गणगोत जरी फार ।
तरी माऊली होऊनी
केला त्यांचा उद्धार ।। २ ।।

प्रीतीच्या पलीकडे
ज्या सर्वां नेती ।
जपून सांभाळ करती
त्या तळहाती ।। ३ ।।

साधकांस त्यांनीच जपावे ।
तेणे जीवोद्धार होईल निष्ठेने ।। ४ ।।

मोक्षापरी आम्ही जाऊ ।
माऊलीच्या रूपात वसे ही दुर्गामाई ।। ५ ।।

परम पूज्यांचीच (टीप १) ही संकल्पना ।
त्यातून श्रीसत्‌शक्ति (टीप २),
श्रीचित्‌‌शक्ति (टीप ३) साकार होई ।। ६ ।।

या त्रयींचे (टीप ४) अवलोकन करा ।
तेणे कृष्णभक्तीची होई साकार कामना ।। ७ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप २ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

टीप ३ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

टीप ४ – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे

– आधुनिक पशूवैद्य (डॉ.) अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.९.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक