गिर्ये (देवगड) पाठोपाठ आचरा (मालवण) येथील समुद्रात सापडली चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असलेली नौका

प्रतिकात्मक छायाचित्र

देवगड – सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाला मालवण तालुक्यातील आचरा लाईटहाऊस समोरील समुद्रात ८ नॉटीकल मैल अंतरावर (समुद्री अंतरावर) ४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११.१५ वाजता चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असलेली; मात्र रत्नागिरी येथील ‘अल हज अब्दुल्ला’ ही दुसरी मासेमारी नौका सापडली. या नौकेला देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या कह्यात देण्यात आले आहे. देवगड सागरी सुरक्षा शाखेच्या पथकाची आचरा येथील समुद्रात गस्त चालू असताना ही नौका सापडली. या नौकेवर एकूण ४२ कर्मचारी होते. याविषयी पुढील कारवाईसाठी तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. ३ ऑक्टोबरला तालुक्यातील गिर्ये येथील समुद्रात अशाच प्रकारे चिनी बनावटीची संपर्क यंत्रणा असलेली मासेमारी नौका पकडण्यात आली होती.