|
|
जळगाव – येथील आझादनगर परिसरात धर्मांधांनी एका हिंदु तरुणीची छेड काढली. (हिंदु तरुणींनो, तुमची छेड काढणार्या धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक) यावरून हिंदू आणि धर्मांध यांच्यात वाद झाला. त्यानंतर २ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजता धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली. या वेळी शेकडो धर्मांधांचा जमाव जमला होता. धर्मांधांनी गृहरक्षक दलात कार्यरत असलेल्या एका हिंदूच्या घराबाहेरील श्री गणेशाच्या चित्राची तोडफोड केली, तसेच घराचीही हानी केली. (हिंदूंच्या देवतांची विटंबना करणार्या धर्मांधांना पोलिसांनी कठोरात कठोर शासन करावे ! – संपादक) शहराच्या तांबापुरा भागातूनही काही धर्मांध येथील धर्मांधांच्या साहाय्यासाठी आले होते. पोलीस घटनास्थळी आल्यावर धर्मांधांनी पळ काढला. पोलिसांनी मात्र बहुसंख्य हिंदूंसह २९ जणांवर गुन्हे नोंदवले. (आक्रमण धर्मांधांनी केले आणि गुन्हे मात्र हिंदूंवर नोंदवले, हा पोलिसांचा हिंदुद्वेष्टेपणा नव्हे तर काय ? – संपादक)
जळगावात दंगल, पोलिसांवर दगडफेक; ‘उसने हमारी बहन को छेडा है’ म्हणत…#Jalgaon #Crime #Riot https://t.co/l8jCDH96sq
— Maharashtra Times (@mataonline) October 3, 2021
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत एक नागरिक घायाळ झाला असून तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. (पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करणार्या धर्मांधांचा उद्दामपणा लक्षात घ्या ! – संपादक) यात पोलिसांच्या वाहनावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्याची हानी झाली आहे. या प्रकरणी संशयितांना कह्यात घेण्याचे आणि गुन्हा नोंदवण्याचे काम चालू आहे.