‘ऑनलाईन’ कार्यक्रमात उपस्थित अनेकांमधून सनातनच्या साधिकेचे वेगळेपण सहजतेने आणि अचूकपणे निरीक्षण करून सांगणारी कु. शरण्या सावंत (वय ९ वर्षे) !

‘१०.१.२०२१ या दिवशी सायंकाळी ७ वाजता मी भ्रमणभाषवर ‘उर्वशी डान्स, म्युझिक, आर्ट’ आणि ‘इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ यांच्या वतीने ‘पॅनेल डिस्कशन ऑन इंडियन कल्चर’ हा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ पहात होते. या कार्यक्रमात सूत्रसंचालकासह एकूण ७ जण सहभागी झाले होते. काही वेळानंतर आमच्या घरासमोर रहाणारी कु. शरण्या सावंत (वय ९ वर्षे) ही लहान मुलगी मी पहात असलेला कार्यक्रम माझ्या शेजारी बसून पाहू लागली. तिला ‘हा कोणता कार्यंक्रम आहे ? त्यात सनातनचा कुणी सहभागी आहे का ?’, इत्यादीविषयी काहीच माहिती नव्हते. त्या वेळी कु. शरण्या आणि माझ्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

कु. शरण्या सावंत
कु. राजश्री सखदेव

कु. शरण्या : (भ्रमणभाषच्या पडद्यावर दिसत असलेल्या कु. तेजल पात्रीकर यांच्याकडे बोट दाखवून) या पुष्कळ तेजस्वी आहेत.

कु. राजश्री : तेजस्वी म्हणजे काय ? गोर्‍या आहेत, असे का ?

कु. शरण्या : नाही. त्या इतर सर्वांपेक्षा पुष्कळ वेगळ्या दिसत आहेत. म्हणून मी तेजस्वी म्हटले. त्या सनातनच्या आहेत का ?

कु. राजश्री : ‘त्या सनातनच्या आहेत’, असे तुला का वाटते ?

कु. शरण्या : त्यांच्या मागे प्लेन आहे. (पार्श्वभूमी एकाच रंगाची आहे.) कोपर्‍यात सनातनचा लोगो (बोधचिन्ह) आहे. (प्रत्यक्षात पडद्यावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे बोधचिन्ह होते.) त्यांची साडी इतरांपेक्षा किती चांगली आहे ? साडीचा रंग चांगला आहे आणि त्यांनी ती व्यवस्थित नेसलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून चांगले वाटते. सनातनचे सगळे असेच असतात, म्हणून मी ‘त्या सनातनच्या आहेत का ?’, असे विचारले.

प्रत्यक्षातही शरण्याने म्हटल्याप्रमाणेच होते. कु. तेजल पात्रीकर सोडून कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांची पार्श्वभूमी, त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांचा रंग आणि कपडे परिधान करण्याची पद्धत सात्त्विक नव्हती. भ्रमणभाषच्या छोट्या पडद्यावर ७ जण दिसत होते. प्रत्यक्षात कुणाचेच तोंडवळे स्पष्ट दिसत नव्हते. त्यातून शरण्याने उत्तम निरीक्षण केले आणि सूक्ष्मातून जे जाणवते, ते सांगितले.

कृतज्ञता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सनातनच्या साधकांचे वेगळेपण समाजातील व्यक्तींच्याही लक्षात येत आहे. शरण्यासारखी लहान मुले भावी ईश्वरी राज्यातील असल्याने त्यांना सूक्ष्मातील कळते. त्यामुळे ती इतरांच्या तुलनेत सनातनच्या साधकांचे वेगळेपण सहजतेने आणि सविस्तरपणे सांगू शकतात. भावी ईश्वरी राज्य चालवण्यासाठी पिढी निर्माण करणार्‍या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’

– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१.२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक