कोकण रेल्वे पोलिसांनी अनधिकृत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ कह्यात घेतला !

प्रतिकात्मक छायाचित्र

मडगाव, १९ सप्टेंबर (वार्ता.) – कोकण रेल्वे पोलिसांनी १८ सप्टेंबर या दिवशी रात्री मडगाव कोकण रेल्वेस्थानकावरील एका कारवाईत अनधिकृत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मिळून २३ लक्ष रुपये किमतीचा माल कह्यात घेतला आहे. मडगाव कोकण रेल्वेस्थानकाच्या सामान ठेवण्याच्या खोलीतून हे साहित्य कह्यात घेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी वास्को येथील एका व्यावसायिकाला कह्यात घेतले आहे. कोटा, राजस्थान येथून हा गुटखा आणण्यात आला होता.