अशा देशद्रोह्यांना जोपर्यंत भरचौकात फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत असे कृत्य करणार्यांवर जरब बसणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ? – संपादक

जयपूर – सैन्य आणि राजस्थान यांच्या गुप्तचर विभागांनी राजस्थानमधील झुंझुनू येथील नरहर भागातून एका पाकिस्तानी हेरास अटक केली. संदीप कुमार (वय ३० वर्षे) असे त्याचे नाव असून तो पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.साठी हेरगिरी करत होता. तो येथे एक ‘गॅस एजन्सी’ चालवतो. तेथून जवळच सैन्याचा तळ असून तो तेथेही गॅसचा पुरवठा करतो.
राजस्थानचे पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्रा म्हणाले, जुलै २०२१ मध्ये आय.एस्.आय.च्या अधिकार्यांनी संदीप कुमार याच्याकडे येथील सैन्यतळाची माहिती आणि छायाचित्रे मागितली होती. त्यानुसार संदीप याने सैन्याच्या नरहर येथील तळाची छायाचित्रे, तसेच संवेदनशील गोपनीय सूचना ‘व्हॉट्सअॅप’, भ्रमणभाष, तसेच ‘व्हिडिओ कॉल’ यांद्वारे आय.एस्.आय.च्या अधिकार्यांना पाठवली. यासाठी त्याला पैसे दिले जात होते.
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित