प्रयागराज – अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळ असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. जिल्हा न्यायालयाकडून सर्वेक्षणाचा आदेश देण्यात आला होता. त्याला मुसलमान पक्षाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. तसेच जिल्हा न्यायालयात या प्रकरणावर चालू असलेली सुनावणीही थांबवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.