
कोल्हापूर, १ सप्टेंबर – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून शशिकांत मुचंडी, तर कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद मुजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गिरीधर जोशी आणि बाबूभाई पटेल यांची उपाध्यक्ष म्हणून, तर अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या संयोजकपदी सुरेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मातृशक्ती संयोजिका म्हणून सुनेत्रादेवी घाटगे यांची, तर दुर्गावाहिनी संयोजिका म्हणून ऋतुजा जमदाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोरक्षा प्रमुख म्हणून संजय पाटील, मठ-मंदिर संपर्कप्रमुख म्हणून श्री. उमाकांत राणिंगा, धर्माचार्य संपर्क प्रमुख म्हणून प्रसन्न मालेकर, तर समन्वय मंचप्रमुख म्हणून श्री. राजेंद्र मकोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !