पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षांसह ५ जणांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० ऑगस्ट या दिवशी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – लाचप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष अधिवक्ता नितीन लांडगे यांच्यासह ५ जणांच्या जामीन अर्जावरील निकालाची सुनावणी ३० ऑगस्ट या दिवशी होणार आहे. या प्रकरणी उल्लेख झालेले १६ स्थायी समितीचे सदस्य असून त्यांच्याकडेही चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत अटकेत असलेल्या आरोपींना जामीन देऊ नये; कारण जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकरता येत नाही. असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अधिवक्ता रमेश घोरपडे यांनी केला.