
तासगाव (जिल्हा सांगली), २४ ऑगस्ट (वार्ता.) – सनातनची जुळेवाडी येथील साधिका कु. प्रज्ञा रवींद्र कुंभार (वय १४ वर्षे) महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांच्या वतीने घेतलेल्या ‘एन्.एम्.एम्.एस्.’ परीक्षेमध्ये २०० पैकी १०९ गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. तिला पलूस तालुक्यातील बह्मनंद विद्यालय, बह्मनंदनगर येथील वर्गशिक्षक आणि सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याचसमवेत स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज मधील प्राचार्य अन् सर्व शिक्षक यांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले. ‘भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने, तसेच सर्व शिक्षक, प्राचार्य यांनी केलेले मार्गदर्शन यांमुळे हे यश मिळवता आले’, असे कु. प्रज्ञा हिने सांगितले.
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच