खलिस्तानी आतंकवादी भारताच्या सुरक्षेला धोकादायक असून त्यांचा नायनाट आवश्यक ! – संपादक

नवी देहली – स्फोटकांनी भरलेले डबे बाळगल्याच्या प्रकरणी गुरुमुख सिंह या खलिस्तानी आतंकवाद्याला अटक करण्यात आली. गुरुमुख सिंह हा फुटीरतावादी खलिस्तानी चळवळ चालू करणारा आतंकवादी जरनैलसिंह बिंद्रनवाले याचा भाचा, तर अकाल तख्तचा माजी नेता जसबीरसिंह रोडे याचा मुलगा आहे.
देहली येथे २६ जानेवारी या दिवशी शेतकरी आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाला. त्यात जसबीरसिंह रोडे याचा हात होता. एन्.आय.ए.ने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) नुकतीच जालंधरमधील एका गावात रहाणार्या जसबीरसिंह रोडे याच्या घरावर धाड घातली होती. या वेळी स्फोटके जप्त करण्यात आली, तसेच गुरुमुख सिंह याला अटक करण्यात आली. गुरुमुख सिंह याला पाकिस्तानमध्ये रहाणार्या त्याचा काका लखबीर सिंह याच्याकडून स्फोटके पुरवली जात होती. लखबीर सिंह हा पाकिस्तानमध्ये रहात असून तो खालिस्तानी आतंकवादी आहे.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !