असे आंदोलन का करावे लागते ?

श्रीरामपूर (नगर), १५ ऑगस्ट – बेलापूर येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच एका तरुणाने पळवून नेले. या प्रकरणी पोलिसांनी पसार आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करावी, तसेच हा तपास स्थानिक शाखेकडे सोपवावा, यासाठी येथील महाराणा प्रताप संघटनेच्या वतीने बेलापुरात १३ ऑगस्ट या दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संदर्भात पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या लेखी आश्वासनानंतर ४ दिवसांत आरोपीस अटक न झाल्यास गाव बंद ठेवण्याची चेतावणी देत आंदोलन मागे घेण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा आणि भाजप ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, तसेच विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !