
पिंपरी-चिंचवड – येथे वड, पिंपळ, चिंच, आंबा, उंबर, फणस, पेरू, आवळा, जांभूळ अशी जवळपास ५ लाख देशी झाडे या वर्षीच्या पावसाळ्यात लावली जाणार आहेत. शहरातील दाट वने म्हणजे ‘ऑक्सिजन पार्क’ सिद्ध करण्यासाठी मोठ्या संख्येने झाडे लावण्यात येणार आहेत, तसेच महापालिकेच्या कह्यात असलेल्या आरक्षित जागेत आणि कडेने झाडे लावण्यात येणार आहेत. सप्टेंबरच्या शेवटपर्यंत २ लाख झाडे, तर उर्वरित ३ लाख झाडे लावण्याचे नियोजन त्यानंतर केले जाणार आहे. महापालिका केवळ झाडे लावणार नाही, तर त्यांचे संवर्धन करणार आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी दिली. हरित पिंपरी-चिंचवडसाठी उद्यान विभाग कार्यरत झाला आहे.
वृक्षारोपणामुळे घनदाट सावलीसह पक्ष्यांना आसरा मिळतो. देशी झाडे आपल्या मातीशी पूर्णपणे समरस झालेली असून स्थानिक पक्षी आणि प्राणी यांसाठी उत्तम निवारा अन् अन्न पुरवतात. या झाडांना बाहेरील खतांची किंवा अधिक पाण्याची आवश्यकता भासत नाही.
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
‘सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये दिसणारी व्यक्ती मीच आहे’, अशी आरोपीची स्वीकृती !
पुणे विभागात धरणातील जलसाठ्यात लक्षणीय तूट !
आजपासून महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशूसंवर्धन विभाग यांच्या वतीने राज्यभरात ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे आयोजन !