एका कार्यकर्त्याला अटक
हिंदुद्वेषाची काविळ झालेल्या भीम आर्मीवर आता केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी केली पाहिजे !

सुपौल (बिहार) – येथील महादेवपट्टी गावामध्ये भीम आर्मीच्या दोघा कार्यकर्त्यांनी शिवमंदिरातील शिवलिंगावर पाय ठेवून छायाचित्र काढले आणि ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून शैलेंद्रकुमार राम या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे, तर चंदनकुमार राम नावाच्या कार्यकर्त्याचा पोलीस शोध घेत आहेत. विश्व हिंदु परिषदेने पोलिसांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या दोघा आरोपींनी हिंदु धर्माच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह विधानेही प्रसारित केली होती.
छायाचित्र प्रसारित झाल्यावर गावकर्यांनी पंचायत बोलावली. यात दोघाही आरोपींना चूक स्वीकारण्यास सांगितले; मात्र त्यांनी चूक स्वीकारण्यास नकार देत ग्रामस्थांना मारहाण आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !