लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकार्‍यांकडून धर्मांधांची पाठराखण !

१. लव्ह जिहादप्रकरणी पोलीस निरीक्षकाने पैसे घेऊन हिंदु मुलीला धर्मांध  कुटुंबाकडे सोपवणे आणि हिंदु कुटुंबाला फसवणे

१ अ. हिंदु मुलीला धर्मांध मुलाने पळवणे, तिच्या आई-वडिलांनी दिलेला तक्रारीचा अर्ज पोलीस निरीक्षकांनी स्वतःकडे ठेवून अन्वेषणाचे ढोंग करणे आणि आई-वडील हिंदुत्वनिष्ठांसमवेत पोलीस ठाण्यात आल्यावर खरा प्रकार समोर येणे : ‘वर्ष २०१० मध्ये माझे पुन्हा एका तालुक्याच्या पोलीस ठाण्यात स्थानांतर झाले. तेथे मी पोलीस निरीक्षकांचे दफ्तरी (कार्यालयीन) काम पहात होतो. एकदा त्या तालुक्यात एका धर्मांध मुलाने हिंदु मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले. त्यामुळे तिचे आई-वडील तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते; मात्र पोलीस अधिकार्‍यांनी त्यांच्याकडून तक्रार प्रविष्ट करून न घेता साधा अर्ज घेतला आणि त्यांना परत पाठवले. पोलीस निरीक्षकांनी अर्ज स्वत:जवळच ठेवला. मुलीच्या आई-वडिलांना ‘पोलीस अन्वेषण करत आहेत’, असे भासवले. मी दफ्तरी असतांनाही पोलीस निरीक्षकांनी मला या विषयाचा ४ दिवस थांगपत्ता लागू दिला नाही. ४ दिवसांनी मुलीचे आई-वडील काही हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत पोलीस ठाण्यात आले. तेव्हा मला हे प्रकरण समजले. तोपर्यंत धर्मांधांनी पोलीस निरीक्षकांशी हातमिळवणी केलेली होती.

१ आ. मुलगा-मुलगी मुंबईला असल्याचे समजल्यावर त्यांना पोलीस ठाण्यात आणणे, महिला शिपायाच्या समोर मुलीची आई-वडिलांशी भेट घालून दिल्याने दबावापोटी ती काहीही न बोलणे अन् तिने आई-वडिलांसमवेत जाण्यास नकार दिल्याने पोलीस निरीक्षकांना आयते कोलीतच मिळणे : ४ दिवसांनी धर्मांध मुलगा आणि हिंदु मुलगी मुंबई येथे असल्याचे समजले. तेथून त्यांना कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षकांनी मुलीला महिला पोलीस शिपायाच्या देखरेखीखाली सोपवले. शिपायाच्या समोरच तिला आई-वडिलांना भेटायला दिले. वास्तविक आई-वडिलांना स्वतंत्र भेटायला देणे अपेक्षित होते. महिला शिपायासमोर भेट होत असल्याने दबावापोटी ती आई-वडिलांशी मनमोकळेपणाने बोलूच शकली नाही. तिने आई-वडिलांसमवेत जाण्यास नकार दिला. पोलीस निरीक्षकांनी मुलीच्या आई-वडिलांना सांगितले की, तुमची मुलगी तुमच्याकडे येण्यास सिद्ध नाही. तिने लग्न केले असून ती सज्ञान आहे. त्यामुळे आम्हीही काही करू शकत नाही. त्यानंतर तिच्या आई-वडिलांना परत पाठवून दिले.

१ इ. साधक पोलीस अधिकारी हिंदु मुलीच्या नातेवाइकांना साहाय्य करत असल्याचे वाटून धर्मांध पोलिसाने लक्ष ठेवणे आणि ८ मासांत दुसरीकडे स्थानांतर होणे : या प्रकरणाच्या काळात मी सनातन संस्थेमध्ये साधनारत होतो. ‘मी हिंदु मुलीच्या नातेवाइकांना साहाय्य करत आहे’, असे वाटून माझ्यावर धर्मांध पोलिसाला लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. तसेच माझा चुकीचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला. त्यामुळे केवळ ८ मासांत माझे दुसरीकडे स्थानांतर झाले.

२. हिंदु मुलगा आणि अल्पसंख्यांक मुलगी पळून गेल्यावर त्या प्रकरणी दिसून आलेली पोलिसांची दुटप्पी भूमिका !

२ अ. हिंदु मुलगा आणि अल्पसंख्यांक मुलगी पळून गेल्यावर पोलिसांनी हिंदु मुलावरच गुन्हा नोंद करणे : अन्य एका तालुक्याच्या ठिकाणी एक हिंदु मुलगा आणि अल्पसंख्यांक मुलगी दोघे पळून गेले होते. त्यानंतर ते काही दिवस बेपत्ता होते. मुलीचा शोध लागेपर्यंत धर्मांधांचा जमाव प्रतिदिन पोलीस ठाण्यात येऊन आवाज उठवत असे. या कालावधीत धर्मांधांच्या सर्व तक्रारी स्वीकारण्यास लावून पोलीस निरीक्षकांनी हिंदु मुलावर गुन्हे नोंदवले. हिंदु मुलगा आणि अल्पसंख्यांक मुलगी कोल्हापूर येथे असल्याचे मुलीच्या नातेवाइकांना समजले. त्यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन मुलीला परत आणत असल्याचे सांगितले. निरीक्षकांनीही त्यासाठी अनुमती दिली.

२ आ. अल्पसंख्यांक मुलीला आई-वडिलांकडे सोपवल्याने त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आणि तिने हिंदु मुलासमवेत जाण्यास नकार देऊन स्वतःच्या आई-वडिलांसमवेत जाणे : मुलीच्या नातेवाइकांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. अल्पसंख्यांक मुलीला पोलीस निगराणीखाली न ठेवता आई-वडिलांकडे सोपवले. त्यामुळे त्यांनी मुलीवर आध्यात्मिक स्तरावरील सर्व उपाय केले. त्यानंतरच्या चौकशीत मुलीने हिंदु मुलासमवेत जाण्यास नकार दिला आणि ती तिच्या आई-वडिलांच्या समवेत निघून गेली. इकडे मात्र हिंदु मुलावर गुन्हे नोंद झाले.

२ इ. अल्पसंख्यांकांच्या आकांडतांडवाला सामोरे जाण्याची पोलिसांची मानसिकता नसल्याने कारवाई केवळ हिंदूंवरच केली जाणे : अल्पसंख्यांक संघटित असल्यामुळे अशा प्रकरणामध्ये धर्मांधांना झुकते माप देण्यात येते. त्यांनी केलेल्या आकांडतांडवाला सामोरे जाण्याची पोलीस अधिकार्‍यांची मानसिकता नसते. केवळ अल्पसंख्यांकांना शांत ठेवण्यासाठी हिंदूंवर कारवाई करण्यात येते. हिंदूंवर कारवाई केल्याने अल्पसंख्यांक शांत रहातात, हे ‘शस्त्र’च पोलिसांना मिळाले आहे. त्याचा वापर ते नेहमी करतात.’

– एक पोलीस अधिकारी


सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक