
सांगली, ५ ऑगस्ट (वार्ता.) – १ ऑगस्ट या दिवशीच्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तुंग येथील ‘अंकुर बालमंदिर’ या शाळेने इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत लोकमान्यांची वेशभूषा करून, त्यांच्यावर भाषण करून त्याचा ‘व्हिडिओ’ सिद्ध करून शाळेकडे पाठवायचा होता. या स्पर्धेत सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला बालसाधक कु. ईशान (वय ७ वर्षे) हा सहभागी झाला होता आणि त्यात त्याचा प्रथम क्रमांक आला. या स्पर्धेत एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या यशाविषयी कु. ईशानचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !
भिवंडी येथे ८८ जणांना विषबाधा, मुसलमान उपाहारगृह चालकाविरुद्ध गुन्हा नोंद !
परभणीत मंदिराचे छत कोसळले; ७ भाविकांचा मृत्यू !
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी