चांगले जीवन, मुलांचे शिक्षण आणि अन्नाची व्यवस्था करण्याचे लालूच !
मोदी सरकारने हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे हिंदूंना वाटते !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील फूलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील करखियाव नावाच्या गावातील एका हिंदु कुटुंबाला ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या तिघांना अटक करण्यात आली आहे. विजय कुमार आणि किरण हे दांपत्य आणि तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून आलेला नील तुरै असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. (बाटगे ख्रिस्ती धर्मांतर करूनही स्वतःचे हिंदु नाव पालटत नाहीत; कारण त्यांना अन्य हिंदूंचे धर्मांतर करायला सोपे जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक) हिंदु जागरण मंचाचे प्रदेश मंत्री गौरीश सिंह यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
तिघे आरोपी करखियाव या गावातील लालजी विश्वकर्मा नावाच्या हिंदूच्या घरी पोचले होते. त्यांनी कुटुंबाला चांगले जीवन, मुलांचे शिक्षण आणि अन्नाची व्यवस्था आदींची लालूच दाखवली होती. आरोपींवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !