पुणे येथील ‘गारवा हॉटेल’चे मालक रामदास आखाडे यांच्या हत्येप्रकरणी १९ वर्षांच्या तरुणीला अटक

महिलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग चिंताजनक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे, २९ जुलै – हॉटेलच्या व्यावसायिक स्पर्धेतून ‘गारवा हॉटेल’चे मालक रामदास आखाडे यांची काही दिवसांपूर्वी डोक्यात तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी यातील मुख्य आरोपीसह सुपारी देणार्‍या बाळासाहेब खेडेकर या हॉटेल मालकालाही अटक केली होती. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात गुन्ह्यात वापरलेली तलवार घरात लपवून ठेवत आरोपींना साहाय्य केल्यामुळे काजल या १९ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे.