लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांना यापुढे हिंदूंनी मतदान करू नये ! – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

उजवीकडे बच्चू कडू

मुंबई – नाशिकमधील हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांचा विवाह रहित झाला असतांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथे जाऊन लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले. त्यांनी हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांना प्रसिद्धीमाध्यमांपुढे एकत्र आणले. असाच पुढाकार ते मुसलमान मुलीचा विवाह हिंदु मुलासमवेत करण्यासाठी घेणार का ? बच्चू कडू यांनी हिंदु धर्मविरोधी कार्य केले आहे. यामुळे यापुढे हिंदूंनी त्यांना मतदान करू नये, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी केले आहे. याविषयी ‘आपण सर्वाेच्च हिंदु धर्मपिठाकडे लवकरच तक्रार करणार आहोत’, असे या वेळी सेंगर यांनी म्हटले.

या वेळी श्री. अजयसिंह सेंगर पुढे म्हणाले, ‘‘बॉम्बे’ या हिंदी चित्रपटात अभिनेता हिंदु आणि अभिनेत्री मुसलमान दाखवली; म्हणून धर्मांधांनी संपूर्ण देशात जाळपोळ करून शेवटी चित्रपटाचे दिग्दर्शक मणीरत्नम यांच्या घरावर बॉम्ब फेकला होता. ते चित्रपटातही सहन करत नाहीत. आम्ही मात्र प्रत्यक्ष पहात असतो. बच्चू कडू यांनी नसत्या भानगडीत पडू नये. त्यांनी स्वत:च्या खात्याशी निगडित प्रश्न मार्गी लावावेत. ‘लव्ह जिहाद’ला पाठिंबा देऊन तुम्ही पाप करत आहात.’’