गुन्हेगारांपासून स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथील कुट्टीचालजवळील नेल्लिक्कुन्नु येथे गांजा माफियांकडून पोलिसांवर पेट्रोल बॉम्बद्वारे आक्रमण करण्यात आले. यामध्ये टिनो जोसेफ नावाचे एक पोलीस अधिकारी घायाळ झाले. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. १६ जुलै या दिवशी सकाळी ही घटना घडली. या भागात गांजाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोचले. तेव्हा माफियांनी त्यांच्यावर आक्रमण केले. या वेळी परिसरातील काही घरांचीही हानी झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर अन्य ठिकाणच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले; परंतु तोपर्यंत माफिया जंगलात पसार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
#Kerala: Drug mafia hurls petrol bomb, stones on cops conducting raids in Kuttichal, #Thiruvananthapuram https://t.co/FMli605v3I via @NewIndianXpress
— TNIE Kerala (@xpresskerala) July 16, 2021
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk