
पुणे, २० जून – छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून मिळणार आहेत. या अभ्यासक्रमाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन अँड नेशन बिल्डिंग असे आहे. विद्यापिठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने हा १ वर्षाचा अभ्यासक्रम चालू करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

महाराजांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा अनेक पुस्तकांतून मांडला आहे. या सगळ्याचे बारकावे अभ्यासक्रमात आहेत. हा अभ्यासक्रम २ सहामाही सत्रांमध्ये विभागला आहे. युद्धशास्त्र आणि युद्धनीती, नीतीकार, प्रॅक्टिकल कंपोनेंट अँड रिसर्च मेथडॉलॉजी हे विषय अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात शिकवले जातील, तसेच शिवाजी महाराजांचे आरमार, प्रशासन, फिल्ड व्हिजिट अँड प्रोजेक्ट रिपोर्ट हे विषय अभ्यासक्रमाच्या दुसर्या सत्रात शिकवले जातील. प्रत्येक सत्रात ४ विषय, असे एकूण ८ विषयात अभ्यासक्रमांची विभागणी केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !