अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी कणकवली येथील युवकाला पोलीस कोठडी

‘फेसबूक’वरून झालेल्या ओळखीचा उठवला अपलाभ

कणकवली – ‘फेसबूक’वरून झालेल्या ओळखीचा अपलाभ उठवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी कणकवली तालुक्यातील एका युवकाला येथील न्यायालयाने १२ जूनला ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

पीडित मुलगी इयत्ता १० वीमध्ये शिकत आहे. पुणे येथे कामानिमित्त रहात असलेल्या या युवकाशी तिची फेब्रुवारी २०२० मध्ये फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली. संशयित युवक पुणे येथून कणकवली तालुक्यात असलेल्या त्याच्या गावी आल्यानंतर त्याने ३० जूनला मुलीला एका ठिकाणी बोलावून घेतले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी कणकवली पोलीस ठाण्यात संशयित युवकाच्या विरोधात तक्रार नोंद केली. त्यानुसार संशयित युवक पुणे येथे त्याच्या नातेवाइकांकडे रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे पथक १० जूनला पुणे येथे गेले. तेथे सिंहगड पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या साहाय्याने संशयिताला कह्यात घेऊन ११ जूनला कणकवली येथे आणले अन् १२ जूनला त्या युवकाला न्यायालयात उपस्थित केले.