
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ६ जून या दिवशी दिली, तसेच राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांमध्ये शिवराज्याभिषेकदिन ‘शिवस्वराज्यदिन’ म्हणून साजरा होणार असून यावर्षीपासून त्याचा प्रारंभ केल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. पुण्यातील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ (सीओईपी)च्या वतीने आयोजित शिवस्वराज्यदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, भाजपचे खासदार गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सामंत पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळातही राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या हिताचे निर्णय कसे घ्यायचे, ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून वारंवार मिळते. महाविकास आघाडीचे सरकार याच मूल्यांच्या आधारे महाराष्ट्राच्या सार्वभौम प्रगतीसाठी कटीबद्ध आहे. यंदा कोरोनामुळे सामाजिक सुरक्षेचे नियम असल्याने शिवज्योत रॅली आणि विविध स्पर्धा यांचे आयोजन करता आलेले नाही; परंतु पुढील वर्षी शिवस्वराज्यदिन दिमाखात साजरा होईल. उत्कृष्ट शिवज्योत रॅलीचे आयोजन करणार्या राज्यातील महाविद्यालयाला राज्य सरकारकडून पारितोषिक देण्यात येईल.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !