गर्दी केल्यास कठोर निर्णयांसह दुकाने दिवसाआड चालू ठेवावी लागतील ! – अजित पवारांचे पुणेकरांना आवाहन

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार

पुणे – ‘गर्दी झाली, तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापार्‍यांनाही विनंती आहे, तिच्याकडे लक्ष द्यावे. आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका. कोरोनाचे संकट दूर झालेले नाही. जर गर्दी वाढत राहिली, तर एका बाजूची आज आणि दुस‍र्‍या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने चालू करण्याची वेळ आणू नका. बाहेर जातांना नियमांचे पालन करा’, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

दळणवळण बंदीचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर पुण्यात पुन्हा गर्दी होत आहे. यावर अजित पवारांनी चिंता व्यक्त केली. ६ जून या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.