
संभाजीनगर – येथील एका दैनिकाचे संपादक रवींद्र तहकीक यांनी वर्तमानपत्रात छत्रपती संभाजीराजे आणि भाजपचे नेते अन् माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयी एक लेख प्रकाशित केला होता. या लेखात नारायण राणे यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले असल्याचा आरोप करून राणे समर्थकांनी तहकीक यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या अंगावर शाई फेकली होती. या प्रकरणी तहकीक यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
गणेश उगले, नीलेश भोसले, बाबुराव वाळेकर, उमेश शिंदे अशी आरोपींची नावे असून या प्रकरणातील एका आरोपीचे नाव समजलेले नाही. या प्रकरणी राणे समर्थकांनी वर्तमानपत्राचे कार्यालय गाठून तहकीक यांना खडसावले, तसेच त्यांनी क्षमा मागावी, अशी मागणी केली; मात्र वाद वाढल्याने त्यांनी तहकीक यांच्या अंगावर शाई फेकली होती.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री