दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू, तर ९६३ नवीन कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात २९ मे या दिवशी २७ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र २७६ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ९६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या दीड मासानंतर दिवसभरात १ सहस्रहून अल्प रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण २२.५२ टक्के आहे. दिवसभरात १ सहस्र २०६ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १५६ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या १५ सहस्र ५६ झाली आहे. मडगाव येथे सर्वांत अधिक १ सहस्र ३०१ रुग्ण आहेत. २९ मे या दिवशी फोंडा येथे सर्वाधिक १२५ रुग्ण आढळले, तर त्यापाठोपाठ मडगाव ६५, पेडणे ४८, कांदोळी ४२, पणजी ३३, कुडचडे ३३ आणि सांखळी २८, असे रुग्ण आढळले आहेत.